अभिनेत्री राधा सागर ‘ये रिश्ता क्या कहलाता है ‘ या लोकप्रिय हिंदी मालिकेत दिसणार

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या बऱ्याच मोठ्या घडामोडी होताना दिसून येतायत .  या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळत आहे. अंकिता आणि संजनामध्ये छोटे छोटे हास्यास्पद वाद  देखील आपण पहिले आहेत. सध्या या मालिकेत अरुंधती आजारी असल्याच दिसून येतय त्यासोबतच संजनाला घरी कसं नेता येईल याचा विचार शेखर करताना आपण पाहत आहोत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 या मालिकेत अभिनेत्री राधा सागर अंकिताची भूमिका साकारत आहे. नुकतेच अभि आणि अंकिताचे लग्न झाले असुन याच्यात देखील वाद चालू आहे. प्रेक्षकांना देखील अंकिताची ही नकारात्मक भूमिका आवडत आहे.

अभिनेत्री राधा सागर हिने तिच्या इनस्टाग्राम हॅंडलवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोत ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील शिवांगी जोशी सोबत राधा दिसून येतेय. glad to be working such beautiful beautiful team असं कॅप्शन तिने दिलय यावरून राधा स्टार प्लस वरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत आता आपल्याला दिसणार असल्याच कळत आहे .   याआधी अभिनेत्री राधा सागरने कलर्स टीव्ही वरील ‘बावरा दिल’ या हिंदी मालिकेत तसेच डॉ , BR आंबेडकर या मालिकेत देखील काम केले आहे.

तर तुम्ही अभिनेत्री राधा सागरला हिंदी मालिकेत पाहायला उत्सुक आहात हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा

Leave a Comment