अभिनेता पुलकित सम्राट अलीकडेच त्याचा मेड इन हेवन 2 मधील स्टायलिश लूकमुळे चर्चेत आला. पुलकित सम्राट त्याच्या फॅशनच्या चॉईस साठी चर्चेत आहे. त्याच्या रेड कार्पेट लूक पासून ते त्याच्या बोल्ड बॅकलेस सूटपर्यंत पुलकितचा फॅशन जर्नी अफलातून आहे.
मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या कपड्या मध्ये पुलकित सम्राट हा हटके दिसतोय.
दुसर्या लूक मधून पुलकितची ऍक्सेसरीझिंगची ची आवड दिसून येते.
त्याच्या फॅशन एक्सप्लोरेशन ची आवड ही प्रत्येक लूक मधून दिसून येते. शिखर काळा बॅकलेस सूट असो किंवा एखादा पारंपरिक लूक असो पुलकित नेहमीच कमाल दिसतो.
भूमिकांमध्ये त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुलकितच्या फॅशनच्या आवडीनिवडी काही वेगळ्या आहेत. ” मेड इन हेवन 2″ मध्ये पुनरागमन आणि “फुकरे 3” च्या या आगामी प्रोजेक्ट साठी पुलकित पुन्हा चर्चेत येतोय.


