सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी कर्जतच्या एन डी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचं कारण काय असेल? हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. एवढं मोठ पाऊल त्यांनी कसे काय उचलले असेल याचा तपास सध्या सुरू आहे. पूर्ण सिनेसृष्टी त्यांच्या निधनाने हादरली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या माहितीनुसार आज सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकतांना एन डी स्टुडिओमध्ये सापडला.
नितीन चंद्रकांत देसाई यांनी २००५ साली कर्जत येथे स्टुडिओ उभारला. पूर्ण मराठी सिनेसृष्टीला एन डी स्टुडिओचा अभिमान वाटतो. ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके नम’ अशा हिंदी सिनेमांचं कलादिग्दर्शन त्यांनी केले होते. ‘बालगंधर्व’ मराठी सिनेमाचं कला दिग्दर्शनत्यांनी केले. ‘देवदास’, खामोशी’ या गाजलेल्या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.१९४२ अ लव स्टोरी या चित्रपटातून त्यांनी करीयरची सुरुवात केली होती.
मराठमोळ्या नितीन देसाईने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती. त्यांचा जीवन प्रवास काही सोपा नव्हता. त्यांच्या जाण्याने मराठी हिंदी सिनेसृष्टीतिल कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.