मराठी बिग बॉस नंतर प्रसाद जवादे दिसणार ‘काव्यांजली – सखी सावली’ या नव्या मालिकेत

अभिनेता प्रसाद जवादे हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो नुकताच मराठी बिग बॉस पर्व ४ मध्ये झळकला होता. जरी तो टॉप ५ मध्ये आला नसला तरी त्याचा बिग बॉसचा प्रवास हा चांगलाच होता. त्याची अमृता देशमुख सोबत असलेली बॉंडिंग असो वा त्याचा point of view असो. प्रेक्षकांनी नेहमीच प्रसादला पाठिंबा दिला. अमृता देशमुख आणि प्रसाद यांची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली होती. प्रेक्षकांनी त्याला Winner म्हणून घोषित केले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रसाद अभिनय क्षेत्रात खूपच चांगले काम करतो. त्याने बऱ्याच मालिका आणि सिनेमामध्ये काम केले आहे. कुलस्वामिनी, असे हे कन्यादान,माझिया प्रियाला प्रीत कळेना, एक महानायक डॉ. बी. र. आंबेडकर, अरुंधती,वहिनीसाहेब अशा मोठमोठ्या मालिकांमध्ये प्रसादने काम केले आहे. तसेच नेबर्स, मिस्टर अँड मिसेस सदाचारी या मराठी चित्रपटांमध्ये देखील त्याने काम केले आहे. त्याने छिचोरे आणि एक विलन रिटर्न्स या हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे.

प्रसाद नुकतीच चालू झालेली मालिका काव्यांजली सखी सावली या मालिकेत झळकणार आहे. ही मालिका २९ मे ला प्रदर्शित झाली असून, या मालिकेत प्रीतमची एंट्री होणार आहे. प्रीतमची भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारणार आहे. प्रसाद हा R.J ची भूमिका साकारणार आहे. तो होस्टिंग करणार आहे. तो लवगुरू प्रीतम या नावाने ओळखला जातो.त्याच्या आवाजाने सर्वांच्या दिवसाची सुरुवात होते. काव्यांजली सखी सावली या मालिकेतील अंजली हिची दिवसाची सुरुवात प्रीतमच्या आवाजाने होते. प्रीतमचा आवाज ऐकूण अंजलीला फ्रेश वाटते, असे मालिकेच्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आले आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, “बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरु शकणार नाही. खरंतर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही. पण मी खूप विचार केला की, ह्याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसा देउ शकतो. आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून काव्यांजली – सखी सावली या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांनसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. काव्यांजली मालिकेद्वारे मी प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इंफ्लूएंजर आहे, त्याला प्रेमा विषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं, त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्‍या काळनुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. सर्वांना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय.”

आपण प्रसादला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. आता त्याला आपण या नव्या भूमिकेत पाहणार आहोत. प्रसादला प्रीतमच्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://youtu.be/aeigKN2_HmU

Leave a Comment