‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून ही अभिनेत्री घेणार एक्जिट

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत शर्यतीच एक भयानक वळण आपण पाहिलं. त्यानंतर अभि आणि लतिकाच लग्न देखील सगळ्यांनी पाहिलं पण त्यानंतर मात्र दौलतने संपूर्ण जहागीरदार कुटुंबाच घर आणि जमीन ताब्यात घेतली आहे. अभि आणि लतीका घर मिळवण्यासाठी खुप प्रयत्न करताना दिसून येतायत त्यामध्ये त्यांना नंदिनी देखील मदत करतेय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दरम्यान या मालिकेमद्धे निगेटिव्ह भूमिका साकारणारी कामिनी म्हणजेच मिस नाशिक हिची मालिकेतून एक्जिट होणार आहे. मिस नाशिकचे पात्र अभिनेत्री पुजा पुरंदरे हिने अगदी उत्तमरित्या साकारले होते. तिचा अभिनय तिचे बोलणे यामुळे पुजाने सगळ्यांचीच मन जिंकली आहे आणि यापुढे देखील ती सगळ्यांच्याच लक्षात राहील.

पुजाने मालिकेतील सेटवरचे काही सहकलाकारांसोबतचे खास क्षण शेअर करत म्हंटले आहे की, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून मी निरोप घेत आहे. कामिनी उर्फ मिस नाशिक हे पात्र साकारताना खुप मज्जा आली. तुम्हा सगळ्यांकडून या पात्राला खुप प्रेम मिळालं. सुंदराच्या सगळया टीम बरोबर हा प्रवास मस्त झाला . चॅनल, निर्मिती संस्था, लेखिका, दिग्दर्शक, सहकलाकार, टेक्निकल टीम आणि प्रेक्षक.. सर्वांचे मनापासून आभार .. पुन्हा लवकरच भेटू असं म्हणत तिने मालिकेतून निरोप घेतला आहे.

तर तुम्ही मिस नाशिकला ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मिस करणार का ?

https://www.instagram.com/p/CXblr7JhFek/

Leave a Comment