Pirticha Vanva Uri Petala : कलर्स मराठी वरील पिरतीचा वनवा उरी पेटला आणि रमा राघव या मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अवघ्या काही दिवसातच या दोन्ही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केलं होतं.
रमा राघव मालिकेतील रमा राघव ची जोडी प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली होती आणि पिरतीचा वनवा वरी पेटला या मालिकेतील अर्जुन आणि सावीची लव्ह स्टोरी पाहायला प्रेक्षकांना खूपच आवडत होतं. रमा राघव मालिकेने सुरुवातीला प्रेक्षकांची मने जिंकली पण नंतर ही मालिका थोडी कंटाळवाणी वाटायला लागली. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी घसरला.

पण पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेने पहिल्या भागापासून आतापर्यंत प्रेक्षकांना मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणून खिळवून ठेवले आहे. पण आता ही मालिका देखील बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. रमा राघव मालिकेतील रमा आणि राघवने इंस्टाग्राम ला स्टोरी ठेवत शेवटचे काही दिवस असे लिहिले होते.
त्यामुळे रमा राघव ही मालिका बंद होणार आहे, पण पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेत खूप सारी गुंतागुंत अजून तरी सुटलेली नाही त्यामुळे या मालिकेची वेळ देखील बदलू शकते.
बिग बॉस मराठी 28 जुलै पासून कलर्स मराठी वर येत आहे. बिग बॉस मुळे दरवर्षी एक-दोन मालिका बंद होत असतात आणि बिग बॉस संपल्यानंतर नवीन मालिका सुरू होतात. रमा राघव या मालिकेची वेळ रात्री 9:30 वाजता चा आहे आणि प्रीतीचा वनवा उरी पेटला या मालिकेची वेळ रात्री 10:00 वाजता आहे त्यामुळे या मालिका बंद होतील असं म्हटलं जात आहे.
पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? कोणती मालिका बंद व्हावी आणि कोणती मालिका बंद होऊ नये? तुम्ही बिग बॉस पहायला उत्सुक आहात का ते देखील कमेंट करून नक्की सांगा.
आणखी वाचा :
Tharal Tar Mag 12 June Episode : अर्जुन ने घेतला सायलीचा मुका, लागली प्रेमाची चाहूल..