विश्वंभरमामा खऱ्या मास्टरमाइंडचं नाव सांगणार?

पिरतीचा वनवा ऊरी पेटला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोलीस सावित्रीला सांगतात की आम्ही जेव्हा पंकज चे मोबाईल लोकेशन ट्रेस केले तेव्हा आम्हाला कळालं की ज्या दिवशी त्या वेटरला सुपारी देण्यात आली होती तेव्हा पंकज चा मोबाईल तिथे होता. जर त्याचा याच्याशी काही संबंध नसेल तर त्याचं लोकेशन तिथे का दाखवत होतं? सावित्री म्हणते बरोबर आहे सर तुमचं, मला पंकजला पाच मिनिट भेटायला द्याल का? पोलीस सावित्रीला भेटायला परमिशन देतात!

जेव्हा सावित्री पंकज कडे जाते तेव्हा पंकज म्हणतो मला याच्या विषयी काही माहीत नाही, माझा त्या लोकांशी काय संबंध आणि तुम्हा दोघांना माहित आहे ना मी तुम्हाला किती महत्त्व देतोय, मी हे सगळं का करेल? मला याच्या विषयी काहीही माहीत नाही, माझा त्या लोकांशी काय संबंध? मी हे सगळं का करेल? सावित्री म्हणते मला माहित आहे, तू हे काहीही केलेलं नाही, पण कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. आपली माणसं त्यात अडकवायची म्हणजे पोलीस त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणार नाही. तू काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत!

नंतर सावित्री आणि भाच्या घरी येतात. भाच्या सावित्रीला आडवतो आणि म्हणतो मॅडम, याच्यामागे पंकज खरा सूत्रधार तर नसेल? पंकज च्या मोबाईलचा लोकेशन त्या हॉटेलच्या परिसरात सापडला आहे, याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? तुमच्या घरातलाच कोणीतरी आहे ज्याने तुमच्या नवऱ्याला मारलं, तो जो कोणी मास्टरमाईंड आहे तो खूप हुशार आहे! कुठे ना कुठे त्या विश्वंभरचा संबंध आहे आणि पंकज त्याचाच मुलगा आहे. वळचणीचे वळचणीला जात आहे आणि नागाच्या पोटाला नागच जन्माला येतो. मला माहित आहे पंकज तुमच्या जवळचा आहे पण ही देखील शक्यता असू शकते! त्या विश्वंभरने हेर म्हणून त्या पंकजला तुमच्याकडे पाठवला असेल! पण सावित्री मात्र त्याचं काहीही ऐकत नाही!

सावित्री जेव्हा घरात येते तेव्हा पंकज ची आई रडत रडत सावित्री कडे येते आणि म्हणते काय बोलले पोलीस? माझ्या पंकजला घेऊन आलीस का तू? माझा पंकज असा कधीच करणार नाही. तेव्हा सावित्री म्हणते हे सगळं सांगायची गरज नाही मला आणि सगळ्यांना माहीत आहे पंकज कसा आहे. त्याचा स्वभाव ,त्याचं वागणं – बोलणं, सगळं माहित आहे आम्हाला. त्याची याच्यात काहीही चूक नाही हे देखील मला माहित आहे.

सावित्री आणि भाच्या त्यांच्या रूममध्ये येतात, तेव्हा भाच्या झोपत नाही. तो सावित्रीला म्हणतो माझं डोकं खूप खराब झाल आहे, मला दारूची गरज आहे, मग मला बरं वाटेल! सावित्री त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो काही थांबत नाही! भाच्या विश्वंभर कडे दारू घेऊन जातो. विश्वंभर मामा भाच्याला म्हणतो तो अर्जुन कधीही दारू पीत नव्हता, त्या सावित्री ला जर कळालं ना तू दारू पिला आहेस तर मग अवघड होऊन बसेल! भाच्या म्हणतो आज माझा दारू प्यायचा खूप मूड आहे, चल तू पण ती माझ्यासोबत! मला पण माहित आहे तुला पण दारू प्यायची आहे, तुझ पोरग तिकडं जेलमध्ये सडत बसल आहे, तुला खूप टेन्शन आला आहे!

नंतर दोघेही दारू पितात, भाच्या विश्वंभर कडून या मागचा खरा मास्टरमाईंड कोण आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण विश्वंभर मामा मात्र काहीच सांगत नाही! नंतर तो पंकजला याच्यामध्ये कोणी अडकवले असेल याच्या विषयी विचारतो, तेव्हा विश्वंभर मामा म्हणतो, याच्यामागे बलराम आहे, त्यानेच माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवला आहे! तर मित्रांनो पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा!

tags: piraticha vanva uri petala today episode,piraticha vanva uri petala yesterday episode,piraticha vanva uri petala today promo, piraticha vanva uri petala episode 453, piraticha vanva uri petala 6 june 2024 episode

Leave a Comment