स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो ही मालिका घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे हिने ही मालिका देखील सोडली आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकीच्या भूमिकेमुळे शरयूला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. आता शरयूने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने साखरपुडा उरकला आहे.
साखरपुड्याची माहिती शरयूने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर रोमॅंटिक फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्याची बातमी कळताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेन्टचा वर्षाव केला आहे. शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जयंत लाडे असून, तो एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे.
शरयूने फोटोला छान असे कॅप्शन देखील आहे. आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. Happy and engaged…! गणपती बाप्पा मोरया. अशा सुंदर कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
तुम्हाला शरयू आणि जयंतची जोडी आवडली का? शरयूच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. AtoZ मराठीकडून शरयू आणि जयंत यांना खुप साऱ्या शुभेच्छा!


