दाक्षिणात्य ‘स्कंदा’ चित्रपटात अजय पूरकर साकारणार खलनायक दाक्षिणात्य सिनेसृष्टीला ‘सुभेदार’ची भुरळ!

नाणं खणखणीत असलं की, ते कुठेही वाजतंच. त्याला मग भाषा,प्रांत, प्रदेश यांच्या मर्यादा राहत नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाने आणि सुभेदारांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेते अजय पूरकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर अजय पूरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली आहे. १५ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘स्कंदा’ या दाक्षिणात्य अ‍ॅक्शन चित्रपटात अभिनेते अजय … Read more

अंजलीबाई आणि राणादा ची लग्नानंतरची पहिली मंगळागौर थाटामाटात झाली साजरी. फोटो झाले खूपच व्हायरल !

श्रावण महिन्यातील मंगळागौर या खेळाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. बऱ्याच मालिकांमध्ये मंगळागौरचे एपिसोड टेलिकास्ट केले जात आहेत. लग्नानंतरची पहिली मंगळागौर ही नवविवाहित वधूसाठी खास असते. सर्वांची लाडकी जोडी अक्षया आणि हार्दिक यांची मंगळागौर नुकतीच थाटामाटात पार पडली आहे. लग्नानंतरची त्यांची ही पहिली मंगळागौर खूपच खास होती. त्यांच्या मंगळागौरचे फोटो आणि विडियो सध्या सोशल … Read more

मीरा जोशीचा होणारा नवरा आहे नृत्यदिग्दर्शक, मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा आहे विजेता!

अभिनेत्री, नृत्यांगना मीरा जोशीने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. होणाऱ्या नवऱ्यासोबत उरण बीच वरील फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केले होते. तिच्या चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. पण तिच्या प्रियकराचा चेहरा मात्र तिने रीविल केला नव्हता. तिचा होणारा नवरा कोण असेल? तो काय करतो? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले … Read more

सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरे होणार आगळीवेगळे रक्षाबंधन!

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्या मालिकांमधून नेहमी काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न करते. मालिकांचे विविध विषय असोत वा  व्यक्तिरेखेची नवी एन्ट्री, हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आत्ता ज्या मालिका सुरू आहेत त्यांत नेहमीच्याच उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. आता मालिकांत वेगवेगळ्या प्रकारे रक्षाबंधन प्रसंग साजरे केले जाणार आहेत. ‘तुजं माज सपान’ मालिकेत पैलवान प्राजक्ता आपल्या … Read more

पहिल्याच वीकेंडला ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई सुभेदार चित्रपटाची जोरदार घोडदौड!

हिंदवी स्वराज्यातील सुवर्णपान उलगडत सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम सादर करणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला रसिक दरबारी सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळातायेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे … Read more

अभिनेत्री अक्षया देवधरची पहिली मंगळागौर! मंगळागौर मेहंदीची खास झलक केली शेअर!

अभिनेत्री अक्षया देवधरचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातिल मंगळागौर हा स्त्रीच्या आनंदाचा क्षण असतो. अक्षया देवधरची ही पहिली मंगळागौर आहे. तिची मंगळागौरची जोरदार तयारी चालू आहे. तिने सोशल मीडियावर मंगळागौरच्या मेहंदीचा खास विडियो देखील शेअर केला आहे. पाहुयात मेहंदीची खास … Read more

कलर्स मराठीवरील “रमा राघव” मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग! बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन…

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेत येत्या मंगळवारी २९ ऑगस्ट आणि बुधवारी ३० ऑगस्टला रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या यंदाच्या रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे, ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच रमा राघव ही मालिका त्यातल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे विशेष चर्चेत आहे. अत्यंत स्वार्थी … Read more

निर्मात्या आफीफा नाडियाडवाला यांनी गौरी सावंतचा ‘ताली’मधील उल्लेखनीय प्रवास एक्सप्लोर केला!

गौरी सावंत या भारतातील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि HIV/AIDS ग्रस्त लोकांच्या जीवनात बदल घडवत असताना तिच्या प्रभावी प्रवासाने सुष्मिता सेन अभिनीत 2023 च्या वेब-सीरिज “ताली” मध्ये एक अनोखं स्थान मिळवले. या कथाकथनाच्या विजयामागे एक दूरदर्शी चित्रपट निर्माती आफीफा नाडियाडवाला यांचे अनोखं नातं आहे. 2019 मध्ये आफीफा नाडियाडवालाला गौरी सावंत सापडली आणि तिच्या … Read more

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार !

बॉलीवूडचा विचार केला तर कोणाच्याही मनात प्रथम नाव येते ते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्स ने बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. संपूर्ण देश या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. एका अंतर्गत सूत्रानुसार ” या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र … Read more

बापल्योक १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

बाप म्हणजे धाक.. बाप म्हणजे कडक शिस्त.. बाप म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा रक्षणकर्ता! पण.. आहे तर तो ही माणूसच ना.. लहानपणापासून आपणच वडिलांबद्दल घालून दिलेली ही भीती पुढे वडील-मुलाच्या नात्यात असा काही अवघडलेपणा निर्माण करते की त्यांच्या मनातलं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. अशाच एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गमतीशीर गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे … Read more