अग्गबाई सासूबाई मालिकेतील निवेदिता सराफ यांना करोनाची लागण

अग्गबाई सासूबाई मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या निवेदिता ताई Home Quarantine आहे. त्यांना करोना चे कोणतेही लक्षण दिसत नव्हती. परंतु थोडी सर्दी झाल्यामुळे त्यांनी करोनाची चाचणी करून घेतली आणि त्यांचा रीपोर्ट करोना पॉजिटिव आला.

मालिकेतील इतर कलाकारांची देखील करोना टेस्ट करण्यात आली परंतु इतर कलाकारांचे रीपोर्ट Negative आले आहेत. करोनामुळे अग्गबाई सासूबाई मालिकेकह शूटिंग थांबवण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर शूटिंगसाठी उपस्थित राहतील. मालिकेच्या सेटवरील सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचं मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.

https://www.instagram.com/p/CACi2KAJ5Ei/

Tags: Nivedita Saraf tested corona positive

Leave a Comment