अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कोरोनावर केली मात

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेतील आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ- जोशी यांना काहीदिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान २३ सप्टेंबर रोजी निवेदिता यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली होती. निवेदिता यांना कोणतीच लक्षण जाणवत नसल्या कारणामुळे त्या घरीच क्वारंटाईन होत्या.  निवेदिता यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर अग्गबाई सासूबाई मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होत. सेटवरील इतर कलाकारांचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत सप्ताह विशेष भाग दाखवण्यात आले.   

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कोरानावर यशस्वीरीत्या मात केली आहे. निवेदिता आता कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या असून लवकरच त्या मालिकेमध्ये दिसणार आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेच्या सेटवर जोरदार स्वागत देखील करण्यात आल. आत्ता पुन्हा एकदा निवेदिता ताई जोमाने कामाला लागल्या आहेत. तर मित्रांनो निवेदिता सराफ यांना पुन्हा एकदा ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत पाहायला तुम्ही उत्सुक आहात का ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

https://www.instagram.com/p/CF_hZ4jjH9r/

Tags: Nivedita saraf recovered from corona

Leave a Comment