अभिनेता आशुतोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘अग्गंबाई सासुबाई’ नंतर पुन्हा एकत्र

छोट्या पडद्यावरील ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते . बबडया आणि शुभ्राच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्की याने साकारली होती तर शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी तेजश्री आणि आशुतोषची जोडी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

आणि हे दोघेही आता कामानिमित्त पुन्हा एकत्र आले आहेत. आशुतोषने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक शॉर्ट फिल्म बनवली होती. आणि ती प्रेक्षकांना देखील खुप आवडली ‘संरक्षक देवदूत’ असं या शॉर्ट फिल्मच नाव आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक आशुतोषने केल असुन लेखन तेजश्रीने केले आहे.

तर तुम्हांला तेजश्री आणि आशुतोषला पुन्हा एकत्र अभिनय करताना पाहायला आवडेल का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment