आता सुरू होणार खरा खेळ ! बिग बॉस घरातील सदस्यांना नवनवे टास्क देत असतात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींनाच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसराचा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे एक नवा टास्क “चिऊ ताई चिऊ ताई दार उघड”. आता हा टास्क नक्की काय असणार आहे ? या टास्क मध्ये नक्की काय घडेल ? काय चॅलेंज दिले जाणार आहे ? कोण बाजी मारेल ? काय स्वरूप असेल या टास्कचं ? हे सगळं आजच्या भागामध्ये कळणार असून नुकत्याच बाहेर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे घरातील पुरूश मंडळी महिला सदस्यांना काहीतरी विनवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामध्ये प्रोमोमध्ये आविष्कार मीराला सांगताना दिसत आहे, “आम्ही तुमची सेवा करू इच्छितो, त्यावर मीराच म्हणणं पडलं “तुम्ही ऐकतचं नाही ना माझं”. जय देखील सांगताना दिसला मला निवडा, विशाल, विकास पाटील देखील, अक्षय वाघमारे, उत्कर्ष शिंदे, संतोष (दादुस) सगळेच पुरुष मंडळी घरातील स्त्रियांना आपला मुद्दा पटवून देताना दिसत आहेत. बघूया कोण बाजी मारेल या टास्कमध्ये बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
