सध्या बॉलीवुड मध्ये nepotism हा शब्द खूप गाजतोय. जर एखाद्याचे आई वडील कलाविश्वात सक्रिय असतील तर त्यांचे मुलं देखील कलाविश्वात काम करायची स्वप्न पाहतात. काहीजन या विश्वात टिकतात तर काही जणांना आपला गाशा गुंडाळावा लागतो. जर तुम्ही एखाद्या कलाकाराची मुलं असाल तर तुम्हाला पहिल काम मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागत नाही. परंतु पुढे जाऊन त्यांना देखील खूप कष्ट करून इंडस्ट्री मध्ये टिकाव लागत. परंतु ज्याना कोणाचाही सपोर्ट नाही त्यांना पहिल काम मिळवण्यासाठी खूपच कष्ट कराव लागत हे देखील तितकच खर आहे. ज्या पद्धतीने आपण बॉलीवुडमध्ये कलाकारांची मुलं अभिनय करताना पाहत असतो तसेच मराठी कलाविश्वात देखील कलाकारांची मुलं आहेत ज्यांनी आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तर आज आपण या विडियोमध्ये मराठी कलाकारांची मुलं पाहणार आहोत ज्यांनी अभिनय हे क्षेत्र करियर म्हणून निवडले आहे.
- सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर – श्रीया पिळगांवकर
- महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर – सई मांजरेकर
- सुनील तावडे – शुभंकर तावडे
- अनंत जोग, उज्वला जोग – क्षिति जोग
- शुभांगी गोखले – सखी गोखले
- मृणाल कुलकर्णी – विराजस कुलकर्णी
- महेश कोठारे – आदिनाथ कोठारे
- लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे – अभिनय बेर्डे
Tags: Marathi Actor kids, marathi actress kids, nepotism in marathi film industry, marathi star kids