अभिनेत्री नेहा पेंडसे बिजनेसमॅन शार्दूल बयास यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार

Neha Pendse Wedding with Shardul Singh Bayas

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने आपल्या सोसिअल मीडिया अकाउंट वर नवीन वर्षाचं अवचित्त साधून बिजनेसमॅन शार्दूल सिंग बयास यांच्या सोबत किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. यापूर्वी देखील नेहाने दोघांचा फोटो शेअर केला होता तेव्हा चाहत्यांनी नेहाच्या हातातील रिंग पाहून तिची एंगेजमेंट झाली असल्याचा अंदाज लावला होता. परंतु त्यावेळेस नेहाने तिचे रेलशनशिप जाहीर केलं नव्हतं. मात्र आत्ता तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे कि ती ५ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे.

शार्दूल सिंग बयास आहेत खूप मोठे व्यावसायिक

एवढंच नाही तर नेहाच्या घरी लग्नापूर्वीच्या सर्व पूजा आणि लग्नाची तयारी देखील जोरदार चालू आहेत. नेहाचे पूजेचे काही फोटो सोसिअल मीडिया वर खूपच वायरल होत आहेत. शार्दूल सिंग बयास हे एक मोठे बिजनेसमॅन आहेत. खूप दिवसांपासून ते रेलशनशिप मध्ये आहेत. शार्दूल यांनी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक कार देखील भेट दिली होती.

एका मीडिया चॅनेलशी बोलताना नेहा म्हंटली कि “मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करत आहे. मी नवीन आणि सुंदर कुटुंबात जात आहे.” तर मित्रानो नेहा पेंडसे आणि शार्दूल सिंग बयास यांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा

Neha Pendse Wedding Photo

Tags: neha pendse wedding, neha pendse husband, neha pendse marriage, neha pendse boyfriend, neha pendse wedding with shardul, neha pendse marriage with shardul, neha pendse and shardul bayas, neha pendse lagn

Leave a Comment