Muramba Actress : स्मिता शेवाळे ही ‘मुरांबा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत जान्हवीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने ही मालिका सोडली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठी निराशा झाली. स्मिताने अचानक मालिका सोडल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले. परंतु, नंतर स्वतः स्मिताने तिच्या युट्यूब व्लॉगच्या माध्यमातून यामागचं खरं कारण स्पष्ट केलं. ती आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी पुण्यात शिफ्ट झाली आहे. तिला सतत पुणे-मुंबई प्रवास करणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच तिने मालिकेला रामराम केला.
मुलाचा सांभाळ करण्याचा निर्णय
एका मुलाखतीत स्मिताने सिंगल पॅरेंटिंगवर तिचे विचार मांडले. रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की ती आता सिंगल मदर आहे. तिचा मुलगा कबीर सध्या ९ वर्षांचा आहे आणि ती एकटीच त्याचा सांभाळ करते. ती म्हणाली, “माझ्या आयुष्यात काही मोठे बदल झाले आहेत. मुलासाठी आई-वडिलांपैकी एकजण कायम त्याच्यासोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा मुलं मोठी होतात, तेव्हा त्यांची विचारसरणी पक्की व्हायला हवी आणि त्या प्रक्रियेत पालकांचा हातभार लागतो. मालिका करत असताना माझ्या शिफ्ट्स १२ ते १४ तासांच्या असायच्या. अशा परिस्थितीत मी कबीरकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नव्हते. त्याला शाळेत काय झालं, त्याला काय आवडतं, काय बोलायचं आहे, हे समजून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे आई म्हणून मी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून, त्याच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे, असं मला वाटलं.”
Ankita Walavalkar : कोकण हर्टेड अंकिताच पुष्पा 2 चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य! अंकिता म्हणाली…
कंटेंट क्रिएटर म्हणून नवी सुरुवात
स्मिताने सांगितलं की मालिकेत काम करत नसतानाही ती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी सतत काहीतरी नवीन करण्याचा विचार करत होती. ती म्हणाली, “मी विचार केला की आता मी दुसरं काय करू शकते. याच विचारातून मी पूर्ण वेळ कंटेंट क्रिएटर झाले. यासाठी मला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला हे काम खूप आवडतं आणि त्यामुळे मी सध्या मालिकांपासून दूर राहायचं ठरवलं आहे. पण चांगल्या सिनेमांच्या संधी नक्की स्वीकारेन. सध्या माझं लक्ष प्रामाणिकपणे कंटेंटच्या कामावर केंद्रित आहे.”
Neha Gadre : या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं गरोदर पणात बिकिनी शूट! चाहते म्हणाले..
दुसऱ्या लग्नाबद्दल विचार
मुलाखतीत तिला दुसऱ्या लग्नाचा विचार केल्याबाबत विचारलं असता, स्मिताने प्रांजळ उत्तर दिलं. ती म्हणाली, “मी आणि माझा माजी पती राहुल ओडक वेगळे झालो असलो तरी कबीरचा आणि त्याच्या वडिलांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्यात खूप छान बाँडिंग आहे. आम्ही दोघं एकत्र का राहात नाही, असा प्रश्न कबीरने कधीच विचारला नाही. मी त्याला नेहमी नात्यांची चांगली बाजूच दाखवते. नवरा-बायकोचं नातं वाईट असतं असं सांगण्याची गरज नाही.
Jui Gadakari : तर या कारणामुळे ठरलं तर मग फेम अभिनेत्री आई होऊ शकत नाही.. काय झाल अस?
दुसऱ्या लग्नाचा विचार माझ्या मनात आला होता. परंतु योग्य व्यक्ती भेटली नाही. मला वाटतं की, सिंगल मदर म्हणून मी आता स्वावलंबी आहे. अशा परिस्थितीत पुन्हा नात्यांमध्ये गुंतणं मला कठीण वाटतं. जे काही पुढे होईल, ते सकारात्मक असायला हवं. कारण मी आता केवळ माझ्या स्वतःसाठीच नाही, तर कबीरसाठीही निर्णय घेतले पाहिजेत.”
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल
स्मिताने २०१३ मध्ये निर्माता राहुल ओडकशी लग्न केलं होतं. मात्र, १२ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. सध्या ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य तो समतोल साधत आहे. नुकताच ती ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटात झळकली होती. तसेच कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतानाच ती भविष्यात चांगल्या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलं.
स्मिताचं हे धाडस आणि तिचा मुलासाठी घेतलेला निर्णय खरोखरच प्रेरणादायी आहे. तिने घेतलेले निर्णय तिच्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे तिच्या सांगण्यातून स्पष्ट होतं.