स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील राजन म्हणजेच अभिनेते तसेच गायक अजय पुरकर यांच्या आईचे निधन झालय. सोशल मीडिया द्वारे त्यांनी ही पोस्ट त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. पोस्ट मध्ये त्यांनी म्हंटल आहे , Phoenix उडाला……
मी आजपर्यंत सोशल मीडिया वर कधीच कुठली नकारात्मक पोस्ट केली नाही आणि पुढे सुद्धा करणार नाही. आजूबाजूला अनेक वाईट घटना घडत आहेत. प्रत्येकाला स्वतःचे problems आहेतच. म्हणून आजची पोस्ट देखील वाचणाऱ्याला उमेद देऊन जावी म्हणून हा लेखनप्रपंच….
माझी आई ५ जुलै २०२१ रोजी गेली….phoenix हे मी तिचं ठेवलेलं नाव. खूप लहानपापासूनच मी तिचा आजार जवळून पाहिला होता. शाळेत असल्यापासून घरातली सगळी कामं करण्याची सवय लागली कारण आई सतत आजारी असायची. अनेक शस्त्रक्रिया पचवून प्रत्येक वेळी राखेतून आकाशाकडे झेप घेणे हा तिचा स्वभाव. एकूण १४ शस्त्रक्रिया झाल्या आईच्या आयुष्यात. काही अश्या की ती वाचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची. पण आईची will power इतकी जबरदस्त होती की स्वतःच्या हिमतीवर पुन्हा आयुष्याला भिढायची. जवळ जवळ ३५ वर्ष शारीरिक वेदना सहन केल्या तीनी. पण कधीही चेहरा दुर्मुखला नाही. मिश्किल स्वभाव, नकला करणे, नवीन पदार्थ बनवणे, प्रत्येक सण यथोचित साजरा करणे ह्या गुणांमुळे आई सगळ्यांमध्ये खूप लोकप्रिय.
स्वतःला दुखः असून आनंदात कसं जगावं हे आईनी मलाच नाही तर तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला शिकवलं. Never say die…. हे मी माझ्या आईकडून शिकलो….
आज सुद्धा… RIP, वाईट घटना, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो वगैरे कृपया म्हणू नका….आज देखील ह्या पोस्ट मधून positive energy देण्याचा प्रयत्न करतोय….सध्याचा काळ आपल्या सगळ्यांसाठी खूप अवघड आहे…पण राख झाली तरी हरू नका…पुन्हा राखेतून वर या आणि आभाळाकडे झेप घ्या …phoenix व्हा…
🙏🙏🙏
हर हर महादेव आणि या पोस्टसोबतच त्यांनी त्यांच्या आईचे आणि त्यांच्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत .
अभिनेते अजय पुरकर यांच्या आईला atozmarathi कडून भावपूर्ण श्रद्धांजलि .