मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे एकत्र कुटुंब रंगलय चित्रपटात!

काही कुटुंब व्यवसायात, तर काही कलेत एकत्र रमतात.अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा तीनही माध्यमातून कलेचा वारसा समर्थपणे जपत रसिकांचे मनोरंजन करणारे, कलेत रमणारे असेच एक कुटुंब आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, त्यांचा पुत्र अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवानी रांगोळे हे तिघंही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. आपल्या आजोबांकडून मिळालेला इतिहासाचा वारसा जपत मृणाल कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या ऐतिहसिक भूमिकांमधून आपला ठसा उमटवला आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना कुटुंबाने कशी मोलाची साथ दिली हे पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने आमचं कुटुंबही एकत्र आल्याचा आनंद वेगळा असल्याचं मृणाल कुलकर्णी सांगतात. 

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीम शौर्याची गाथा उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट १८ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचीप्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Leave a Comment