अभिनेत्री मिताली मयेकर बद्दल जाणून घ्या बरंच काही

अभिनेत्री मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे मिताली ने प्रेक्षकांची मने जिंकली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मितालीचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी दादर, मुंबई येथे झाला असून तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यालय, दादर येथून पूर्ण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रूया काॅलेज येथून पूर्ण झाले. मितालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.

‘बिल्लू बारबर’ या हिंदी चित्रपटात मितालीने इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मितालीने फ्रेशर्स, तु माझा सांगाती, उंच माझा झोका, भाग्यलक्ष्मी, असंभव या मालिकांमध्ये अभिनय साकारून घराघरांत पोहचली. मितालीने ‘उर्फी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल. त्यानंतर तिने यारी दोस्ती, आम्ही बेफिकर या मराठी चित्रपटांमध्ये काम केल.

झी मराठी वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक ग’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकेने अगदी काही दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मिताली मयेकर ‘कस्तुरी’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. तर अभिनेता आरोह वेलणकर डॉक्टर सौरभ ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

मिताली सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. मिताली तिच्या बोल्ड लूक मुळे कायमच चर्चेत राहिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे २ वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. २४ जानेवारी २०१९ रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला असून लवकरच दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत.

https://www.instagram.com/p/B3XFoJkp-vp/

Tags: Mitali Mayekar, mitali mayekar biography, mitali mayekar boyfriend, mitali mayekar husband, mitali mayekar age, mitali mayekar birthdate, mitali mayekar family, mitali mayekar movies, mitali mayekar love story

1 thought on “अभिनेत्री मिताली मयेकर बद्दल जाणून घ्या बरंच काही”

Leave a Comment