मिताली मयेकरने Mr. and Mrs…. Next year.. म्हणजे ‘पुढच्या वर्षी मिस्टर अँड मिसेस’ म्हणत सिद्धार्थ चांदेकरला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला आणि लवकरच ते लग्न देखील करणार होते. परंतु करोनामुळे आता हे लग्न पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्येच होणार असल्याच मितालीने तिच्या इनस्टाग्राम पोस्ट द्वारे सांगितल आहे. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपल पैकी एक आहे. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडिया वर त्यांचे फोटो नेहमीच शेअर करत असतात आणि ह्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना देखील खुप आवडते.
आपण सिद्धार्थला गुलाबजाम, क्लाससमेट यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये पाहिले आहे, आणि आता त्याची स्टार प्रवाहवर लवकरच एक नवीन मालिका येत आहे. तसेच मितालीने ‘उर्फी’ ह्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल. सध्या ती झी मराठी वरील ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
Tags: Mitali Mayekar and Siddharth Chandekar Marriage