संपूर्ण देशभरात करोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. अशा सगळया परिस्थीतीत महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्या वाढती असल्यामुळे सरकारने मालिका, चित्रपट शुटींग साठी बंदी घातली. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडायला नको त्यामुळे मालिकेंच तसेच रिअलिटी शोचं शुटींग राज्याबाहेर म्हणजेच गोवा , दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल आहे. परंतु आता गोव्याचे फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात शुटींगला विरोध केला आहे. १० मे पर्यंत गोव्यात मराठी मालिका आणि रिअलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
‘पहिले न मी तुला’ ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे निर्मात्यांन समोर आता पुढे काय करायच हा प्रश्न उभा आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील एकाने माहिती दिली की , “आम्ही सर्वजण आता काळजीत आहोत आणि काय करता येईल याचा विचार करीत आहोत. आमचा सेट वेगळ्या ठिकाणी हलवण्याची आमचा प्लान चालू आहे. आम्ही सर्वजण यावर तोडगा काढत आहोत.”
याचबरोबर रंग माझा वेगळा, मुलगी झाली हो, पहिले न मी तुला , सुर नवा ध्यास नवा आणि अग्गबाई सुनबाई या लोकप्रिय टीव्ही मालिकेंच शुटींग गोव्यात सुरू आहे. गोवा सरकारच्या या निर्णयानंतर निर्माते पुढे कोणत पाऊल उचलणार हे पाहण लक्षणीय असणार आहे.
तर तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.