मराठी सिनेसृष्टीतील या सुप्रसिद्ध जोडप्यांचे वयातील अंतर पाहून तुम्ही पण थक्क व्हाल

अनेक सेलिब्रेटी जोडप्यांमधील वयाचे अंतर हे खुप आहे, परंतु त्यांनी हे सिद्ध केले आहे की वयामधील अंतर ही केवळ एक संख्या आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

निवेदिता जोशी ते अशोक सराफ, महेश मांजरेकर ते मेघा मांजरेकर अशी या मराठी सेलिब्रिटींची यादी आहे. ज्यांच्या वयातील अंतर खुप आहे आणि तरीही त्यांनी हे सिद्ध केले आहे की वयातील अंतरपेक्षा प्रेम हे महत्वाचे आहे.

१] अशोक सराफ आणि निवेदिता जोशी

बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल ,परंतु अशोक सराफ आणि निवेदिता यांच्यातील वयाचे अंतर हे १८ वर्षाचे आहे. निवेदिता सराफ या ५५ वर्षांच्या आहेत तर अशोक सराफ ही ७२ वर्षांचे आहेत. दोघांनी १९९० मद्धे लग्न केले आहे आणि तेव्हापासुन त्यांचे हे नाते अजुनही बळकट आहे.

२] महेश मांजरेकर आणि मेघा मांजरेकर

बिग बॉस मराठी शो होस्ट महेश मांजरेकर हे काही वर्षांच्या नात्यानंतर त्यांची पहिली पत्नी दिपा मेहता पासुन वेगळे झाले. नंतर त्यांनी त्यांच्यापासून ९ वर्षाने लहान असलेल्या मेघाशी लग्न गाठ बांधली महेश मांजरेकर हे ६२ वर्षांचे आहेत तर मेघा ह्या ५३ वर्षांच्या आहेत. महेश मांजरेकर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत तर मेघाला ही पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यांचे कुटुंब बऱ्याच वर्षांनी वाढले आहे आणि आता ते त्यांचे सुखी आयुष्य जगत आहेत.

३] बिजय आनंद आणि सोनाली खरे

बॉलीवुड चित्रपट ‘प्यार तो होना हे’ मधील अभिनेता बिजय आनंद यांनी २० वर्षापूर्वी बॉलीवुड सोडून योगी बनून अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग निवडला आणि आपले आयुष्य योगासाठी दिले. या अभिनेत्याने काही वर्षापूर्वी मराठी अभिनेत्री सोनाली खरेशी आपल्या आयुष्याची गाठ बांधली आणि या दोघांमधील वयाचे अंतर खूप आहे. सोनाली ही ३८ वर्षांची आहे. तर बिजय हे ६५ वर्षांचे आहेत आणि यांनीही हे सिद्ध केले आहे की वयातील अंतर ही फक्त एक संख्या आहे .

४] गिरीश ओक आणि पल्लवी

‘अग्गबाई सासुबाई’ मधील अभिनेता गिरीश ओक यांचे प्रथम त्यांची मैत्रीण पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न झाले . त्यांना एक मुलगी देखील आहे. जी एक प्रसिद्ध गायिका आहे. विवाहाच्या अनेक वर्षांनंतर गिरीश यांनी त्यांच्या जवळची मैत्रीण पल्लवी हिच्याशी लग्न केले. जी त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे.

५]  उमेश कामत आणि प्रिया बापट

२०११ मध्ये विवाहबंधनात अडकलेला मराठी अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या वयाचे अंतर ही ८ वर्षांचे आहे. दोघेही एकमेकांवर खूप जिवापाड प्रेम करतात आणि त्यांचे चाहतेही त्यांची chemistry पाहून नेहमी खुश असतात.

६] सखी गोखले आणि सुव्रत जोशी

लोकप्रिय टीव्ही शो ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांच्यात ८ वर्षाचे अंतर आहे. हे दोघे दिल दोस्ती दुनियादारीच्या सेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि २०१९ मध्ये त्यांनी लग्नाची गाठ बांधली.

Tags: Marathi Celebrity couples age gap

Leave a Comment