मराठी बिगबॉस सीजन २ मद्धे शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांच प्रेम फुललं , यांनी याच शो मद्धे दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुलीही दिली. मध्यंतरी बिग बॉस सीजन २ चा विजेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले की काय असे प्रश्न अनेकांना पडत होते , त्याच्या चाहत्यांना शिव आणि वीणा च्या नात्याबद्दल अनेक प्रश्न होते.
त्याच प्रश्नांची उत्तरं देताना शिव म्हणाला की, ‘वीणा आणि मी सध्या खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत आहोत . ती मालिकेच्या कामात व्यग्र आहे आणि मी माझ्या. लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहोत. अंतर वाढलं की वाद होतात, रुसवे फुगवे होतात, एकमेकांची समजूत काढणंही होतं आणि त्यामुळे प्रेमही वाढतं. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करून योग्य त्या वेळी लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायला आवडेल.’