अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने तिच्या करियरच्या सुरुवातीला खुप struggle केले होते. तेजस्विनी ही खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती नेहमी मुलाखतीत स्पष्ट आणि खुलून बोलते. तिचा न भिणारा अंदाज प्रेक्षकांना खुप आवडतो. तिने खुप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तेजस्विनी पंडित आदिपुरुष चित्रपटात शूर्पणखा ची भूमिका साकारली आहे. आदिपुरुष हा सिनेमा आज १६ जून ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये कोण कोणते कलाकार काम करतात हे आपल्याला माहीतच होते. चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला कळले की शूर्पणखा ची भूमिका मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे. शूर्पणखा या भूमिकेचा खुलासा स्वतः तेजस्विनी ने केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना कळवले आहे.
तेजस्विनीने पोस्ट करत लिहिले आहे, जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं ……….. म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये. आजपासून आदिपुरुष चित्रपटामध्ये मला शूर्पणखा म्हणून पहा. यावर खुप साऱ्या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी खुप शुभेच्छा दिल्यात. पण तेजस्विनी ही दिसायला गोड, सोज्वळ, प्रेमळ आहे. काही चाहत्यांना ही गोष्ट आवडली नाही. तिची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडली नाही. तुम्ही हे नकारात्मक पात्र का केल? असे चाहते तेजस्विनीला कमेन्ट द्वारे विचारत आहेत. शूर्पणखेची भूमिका आपली तेजू साकारतेय, हे काही प्रेक्षकांना आवडले नाही. जेव्हा ही माहिती प्रेक्षकांना कळली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.
आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे ओम राऊत यांनी केले असून, सीतेची भूमिका क्रिती सेननने केली आहे, रामाची भूमिका प्रभासने तर लक्ष्मणची भूमिका सनी सिंगने आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका तसेच रावणाची भूमिका सैफ अली खानने केली आहे. शूर्पणखाची भूमिका आपल्या लाडक्या तेजूने म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केली आहे.
तेजस्विनीची शूर्पणखा ही भूमिका तुम्हाला कशी वाटली? हे कमेन्ट करून नक्की सांगा.