अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत विवाहबद्ध, पाहा लग्नातील पेशवाई थाट

बिग बॉस मराठी सीजन १ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.  शर्मिष्ठाने याआधी तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली होती. २१ जून २०२० रोजी तेजस देसाईसोबत तिचा साखरपुडा पार पडला होता. शर्मिष्ठाचा होणार नवरा तेजस देसाई हा बोस कंपनीमध्ये रेजिनल सेल्स मॅनेजर आहे. ११ ऑक्टोबर २०२०ला शर्मिष्ठा आणि तेजस विवाह बंधनात अडकले. कोरोना संकटामुळे अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शर्मिष्ठाने मेहंदीपासून ते अगदी लग्नसोहळ्यापर्यंत प्रत्येक विधीचे फोटोज तिच्या सोसिअल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. शर्मिष्ठाने तिच्या विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसली होती तर तिच्या पतीने पेशवाई पगडी परिधान केली होती. त्याचबरोबर या लुकला परिपूर्ण असा मास्कहि दोघांनी चेहऱ्यावर लावला होता. शर्मिष्ठा राऊतचे हे दुसरे लग्न असून तिच्या पहिल्या पतीचे नाव अमेय निपाणकर असे होते. परंतु काही कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला.

शर्मिष्ठाने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अभिलाषा’, ‘एक झुंज वादळाशी’, ‘उंच माझा झोका’, ‘कुंपण’, ‘सप्तपदी’, ‘जुळून येती रेशीम गाठी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.  मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने उत्तम कामगिरी बजावली. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटही तिने काम केले आहे. ‘दे धक्का’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘ची व ची सौ कां’, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यांसारख्या मराठी चित्रपटही ती झळकली आहे.          

    

tags: Sharmishtha raut wedding photo, sharmishtha raut marriage photo

Leave a Comment