१] सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही २०२१ मध्ये कुणाल बेनोडेकर सोबत विवाहबद्ध होणार आहे. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. २ फेब्रुवारीला सोनाली आणि कुणाल यांचा दुबई येथे साखरपुडा पार पडला. ही बातमी सोनालीने १९ मे ला म्हणजेच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना दिली आणि आता ते दोघेही २०२१ मदध्ये विवाहबद्ध होणार आहेत.

२] रूपाली भोसले आणि अंकित मगरे: रूपाली आणि अंकितचे सोशल मीडिया वर अनेक छायाचित्र आणि विडिओस आहेत आणि प्रेक्षक देखील याला भरभरून प्रतिसाद देत आहेत रूपाली भोसले हिला आपण ‘आई कुठे के करते’ ह्या मालिकेत संजनाची भूमिका साकारताना पाहत आहोत. रूपाली आणि अंकित ही दोघेही २०२१ मध्ये विवाहबद्ध होणार आहेत.

३] अभिज्ञा भावे आणि मेहुल पै: अभिज्ञा आणि मेहुल दोघेही एकमेकांना लाइफ पार्टनर म्हणून निवडायच्या आधी चांगले मित्र होते. मेहुल हा मूळचा मुंबईचा असून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’ मद्धे ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. तर अभिज्ञा ही अभिनेत्री बनण्याआधी हवाई सुंदरी म्हणून काम करत होती. ह्या दोघांचाही साखरपुडा पार पडला असून हे दोघेही २०२१ मध्ये विवाहबद्ध होणार आहेत.

४] मानसी नाईक आणि परदीप खरेरा: १० नोव्हेंबेरला प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक आणि परदीप खरेरा यांचा साखरपुडा पार पडला परदीप हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर तसेच मॉडेल आहे आणि अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या नृत्यकौशलल्याने प्रसिद्ध आहे. हे दोघेही २०२१ मध्ये विवाहबद्ध होणार आहे असे मानसीने संगितले आहे.

५] मिताली मायेकर आणि सिद्धार्थ चांदेकर: मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही मराठी इंडस्ट्री मधील क्यूट कपल पैकी एक आहेत. २०१९ मद्धे ह्या दोघांचा साखरपुडा पार पडला. सिद्धार्थ ला आपण गुलाबजाम, क्लासमेट यांसारख्या मराठी चित्रपटांमद्धे पहिल आहे तर मितालीला आपण झी मराठी वरील लाडाची मी लेक ग ह्या मालिकेत पाहत आहोत. ही दोघेही २०२१ मद्धे विवाहबद्ध होणार आहेत असं मितालीने स्वतःतिच्या सोशल मीडिया वरुण सांगितल आहे.

Title: Marathi Actress marriage in 2021