अभिनेत्री कंगणा राणावत हिने ट्विट करून मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली आहे. त्यामुळे सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत. मराठी कलाकार देखील ट्विट करून संताप व्यक्त करत आहेत. कंगणाने तिच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की “मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?” हे ट्विट पाहून सर्वजण कंगणावर टीका करत आहेत.
सुप्रसिद्ध मराठमोळी बॉलीवुड अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी कंगणाला खडे बोल सुनावले आहेत. त्या म्हणतात की “प्रिय कंगना, मुंबई हे असं शहर आहे, जिथे बॉलिवूड स्टार होण्याचं तुझं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळे या अद्भुत शहराबद्दल आदरभाव ठेवण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे. पाकव्याप्त काश्मीरसोबत तू मुंबईची केलेली तुलना धक्कादायक आहे! उचलली जीभ आणि लावली टाळ्याला”
या ट्विट नंतर कंगणाने देखील रेणुका शहाणे यांना प्रत्युत्तर देत म्हंटले आहे की “प्रिय रेणुकाजी, सरकारच्या कमकुवत कारभारावर केलेली टीका त्या शहरावरील टीका कधीपासून मानली जाऊ लागली? मला वाटत नाही की आपण इतक्या भोळ्याभाबड्या आहात. आपणसुद्धा रक्तासाठी तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होतात? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या”
त्यानंतर रेणुका शहाणे यांनी पुन्हा कंगणला उत्तर डेट म्हंटल आहे की “प्रिय कंगना, मी सरकारवर टीका करण्यास हरकत घेत नाही. पण “मुंबई पीओकेसारखी का वाटत आहे” ही मला मुंबई आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यात थेट तुलना असल्यासारखं वाटतं. ही तुलना खरोखर खूप वाईट होती. मुंबईकर म्हणून मला ते आवडलं नाही! कदाचित तुझ्याकडून आणखी चांगल्याची अपेक्षा करणे, हाच माझा भोळेपणा होता”
याशिवाय बॉलीवूड मधील मराठमोळा अभिनेता रिटेश देशमुख याने देखील ट्विट केले आहे.
Tags: Marathi actors angry reaction on kangana ranaut twit