अलका कुबल: मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाला प्रचंड यश मिळाले. अलका यांच्या पतीचे नाव समीर आठल्ले असे असून ते छायाचित्रकार आहेत. अलका आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन मुली आहेत. ईशानी हि त्यांची मोठी मुलगी आणि कस्तुरी धाकटी. त्यांची मोठी मुलगी ईशानीने वैमानिक शिक्षण घेतले आहे. ईशानी स्वतः एक पायलट असून २०१५ मध्ये तिला वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं आहे. विशेष म्हणजे घरात चित्रपटाचा वारसा असताना ते क्षेत्र न निवडता ईशानीने तिच्या आवडीचे क्षेत्र निवडले आणि त्यात उंच भरारी घेतली आहे. ईशानी सध्या मियामी, फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. जानेवारी महिन्यात ईशानीचा साखरपुडा पार पडला असून तिचा होणार नवरा हा देखील पायलट आहे. ईशानी दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे.
मोहन जोशी: मोहन जोशी हे मराठी चित्रपटश्रुष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत हि आपल्या अभिनयाची छाप पडली आहे. ‘देऊळ’ बंद या मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली स्वामी समर्थांची भूमिका चाहत्यांना फारच आवडली. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मोहन जोशींच्या पत्नीचे नाव ज्योती जोशी असे आहे. त्यांच्या मुलाचे नाव ‘नंदन जोशी’. नंदन दिसायला जरी हँडसम असला तरी त्याने अभिनय क्षेत्राकडे न वळता इंटिरियर डेसिनिंग मध्ये आपले करिअर पूर्ण केले. तो एक इंटिरियर डिझायनर असून ‘न जे डिसायनेर’ ग्रुप चा मालक आहे.
कुलदीप पवार: मराठी चित्रपटसृष्टीतील भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तिमत्त्व लाभलेले अभिनेते म्हणजेच कुलदीप पवार. कुलदीप पवार हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत. ‘मर्दानी’, ‘अरे संसार संसार’, ‘आली लहर केला कहर’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘शापित’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘जावयाची जात’, ‘सर्जा’ अश्या अनेक चित्रपटांमध्ये कुलदीप यांनी काम केले. २४ मार्च २०१४ रोजी किडनी च्या आजाराने त्यांचे निधन झाले. कुलदीप यांच्या पत्नीचे नाव नीलिमा पवार. त्यांना ऐश्वर्य आणि समृद्ध दोन मुले आहेत. हे दोघंही आज वेलवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मोठा मुलगा ऐश्वर्य हा सिविल इंजिनीर आहे. तो David Adamson and partners overseas, मुंबई येथे कार्यरत आहे.
दिलीप प्रभावळकर: दिलीप प्रभावळकर हे एक मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. तात्या विंचू, चौकात राजा, झपाटलेला यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही आठवणीत आहेत. दिलीप प्रभावळकर यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर आहे. त्यांना एकच मुलगा असून त्याचे नाव केदार असे आहे. तर सोनल ह्या केदार यांच्या पत्नी. केदार यांनी अभिनय क्षेत्राकडे न वळता एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले. केदार आणि त्यांच्या पत्नी सोनल enviromental मॅनॅजमेण्ट सेंटर शी कार्यरत आहेत. हे दोघेही पर्यावरण प्रेमी आहेत.
Tags: Alka Kubal Daughter, Mohan Joshi Son, Dilip Prabhalkar Son, Kuldeep Pawar Son