२०२० मद्धे मराठी इंडस्ट्रीने काही कलाकार गमावले. पाहुया कोणकोणत्या कलाकारांनी २०२० मद्धे ही जग सोडले.
१]आशालता वाबगावकर : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर प्राणघातक करोनाव्हायरस ला बळी पडल्या आणि २२ सप्टेंबर ला त्यांचे निधन झाले. आशालता वाबगावकर यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि टीव्हीवर अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. या अभिनेत्री ने माहेरची साडी, गंमत जंमत आणि वन रूम किचन ह्या चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची ओळख झाली. त्यांने शेवटचा श्वास घेताना प्रसिद्ध मराठी टीव्ही मालिका आई माझी काळुबाई यामद्धे त्या काम करत होत्या.

२]आशुतोष भाकरे : आशुतोष च्या निधनाने संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्काच बसला. आत्महत्तेमुळे मरण पावलेला अभिनेता नैराश्यात होता. भाकर आणि ईचार ठरला पक्का या मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी तो प्रख्यात आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री मयूरी देशमुख हीच तो पती आहे.

३]कमल ठोके : लागीर झालं जी फेम प्रसिद्ध अभिनेत्री कमल ठोके यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. निधन होण्याआधी काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या या अभिनेत्रीचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ही अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत होती आणि बंगलोर च्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

४] जयराम कुलकर्णी : मराठी चित्रपट अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी मार्च २०२० मद्धे अखेरचा श्वास घेतला. पुण्यात वृद्धापकाळाच्या आजारामुळे ज्येष्ठ अभिनेत्याचा मृत्यू झाला. ते ८८ वर्षाचे होते. रेपोर्टनुसार अभिनेता, निधनाआधी काही महिन्याआधी ते तंदुरुस्त आणि चांगले होते. कार्यक्षेत्रात , बनवा-बनवी , थरथराट यांसारख्या यशस्वी मराठी चित्रपटांचा एक अनिवार्य भाग होता. ते टेलिव्हिजनवर बऱ्यापैकी सक्रिय होते.

५]चंद्रकांत गोखले : विक्रम गोखले यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २०२० रोजी निधन झाले. चंद्रकांत गोखले प्रदीर्घ आजाराने ग्रासले आणि रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते साधी माणसं, सुहाग रात, रावसाहेब आणि लोफर यासारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखले जातात. दूरदर्शन टीव्हीवरील विविध कार्यक्रमानमधून या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले.

Tags: Marathi Actors Died in 2020