अभिनेत्री मानसी नाईकने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंड आहे बॉक्सर

आपल्या अदा, स्टाइल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठी सिनेसृष्टीत ओळखली जाणारी अभिनेत्री मानसी नाईकने ती प्रेमात असल्याची कबूली दिली. व्हॅलेंटाईन चा महिना असणाऱ्या फेब्रुवारीत मानसीने हा खुलासा केलाय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मानसी नाईक प्रदीप खरेराच्या प्रेमात पडली आहे. याचा खुलासा मानसी आणि प्रदीप यांनी सोशल मीडियाद्वारे स्वता:च केला आहे. मानसीने नुकतच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड प्रदीपसोबतचा एक फोटो शेअर करत ती प्रेमात असल्याची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव सुरू केला आहे. हे खरं आहे की कोणत्या सिनेमा किंवा अल्बमचं प्रमोशन आहे हे येत्या काळात कळेलच.

https://www.instagram.com/p/B8GB6Wbg3QT/

अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या वाढदिवशी एक फोटो पोस्ट करत आपल्या ‘पार्टनर’ बद्दल सांगितलं आहे.  प्रदीप खरेराच्या प्रेमात ती पडली आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो मॉडेल आणि अभिनेता आहे.

मानसी नाईकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्या दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, “यावर्षी मी स्वतःला गिफ्ट द्यायचे ठरवले तेही प्रेम व कमिटमेंटसोबत. ओळखा काय असेल ते. मेहनती, प्रेमळ व विश्वासू आणि कमिटेड व्यक्ती. हो मी प्रेमात पडली आहे. प्रदीप खरेरा तुझे माझ्या जगात स्वागत आहे.”

Title: Manasi Naik announces her relationship with boxer Pardeep Kharera

Manasi Naik Boyfriend / Husband Images

Tags: Manasi Naik boyfriend, manasi naik boyfriend pradeep kharera,manasi naik husband, manasi naik husband name, manasi naik relationship, manasi naik and pradeep kharera, manasi naik wedding

Leave a Comment