कोरोनामुळे खुप दिवसांच्या ब्रेक नंतर हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसून येतायत. प्रेक्षक देखील अतिउत्साहाने सगळ्याच चित्रपटांचा आनंद लुटतायत. अशातच निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी फेसबूक वर एक पोस्ट शेअर करत काही मराठी कलाकार ग्रुपवर निशाणा साधलाय. त्यांनी या पोस्ट मध्ये म्हंटलय की, काही दिवसांपूर्वी मी याच टोळीचा मराठी चित्रपट पाहायला गेलो. लगोपाट २ दिवस शो रद्द झाले. शेवटी भांडून तिकिट काढून गेलो तर सिनेमगृहात फक्त ७ जण . पुरस्कार सोहळे, टीव्ही चॅनलवरील रियलिटी शो मध्ये स्वतःच्या नावाचा स्टार, सुपरस्टार म्हणून गवगवा करणारे आणि कामासाठी भरपूर पैसे घेणारे हे स्टार स्वतः अभिनय केलेल्या सिनेमासाठी प्रेक्षक थिएटर पर्यंत आणण्याचा करिश्मा दाखवू शकत नाही याचे मला दु:ख झाले पण प्रेस ,मीडिया समोर स्टायलिश कपडे घालून ठराविक ग्रुप मधील कलाकार एकमेकांची अशी तळी उचलत होते , सिनेमाच भरभरून कौतुक करत होते हे सगळ पाहुन हसाव की रडाव असं झाल माझ.
आणि त्यांची हीच पोस्ट काही मीडिया न्यूज चॅनलने नुकताच प्रदर्शित झालेला ‘झुंड’ या चित्रपटाशी संबंधीत आहे अस दर्शवल आहे. हे सगळ पाहून महेश टिळेकर यांनी पुन्हा त्यावर सणसणीत उत्तर दिलय ते म्हणाले की, झुंड सिनेमा विरोधी माझी पोस्ट आहे असा गैरसमज निर्माण करून दिल्यामुळे काही लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि त्यात भर म्हणून बातमी देणाऱ्यांनी झुंड सिनेमाच पोस्टर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फोटो वापरुन आपले कलाकौशल्य दाखवले. ते पाहून काहींनी शिमग्या आधीच बोंबा मारायला सुरवात केली. त्यामुळे शिक्षणाचा अभाव, अर्धवट ज्ञान असणाऱ्यांची संख्या समाजात कीती जास्त आहे ते मला समजले.