महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याने बांधली लग्नाची रेशीमगाठ

मराठी मनोरंजन विश्वात कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. मग तो कोणाचा साखरपुडा असो किंवा कोणाच लग्न. बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. कोणी साखरपुडा उरकून घेतला. सेलेब्रिटी लोकं नेहमी आपल्या चाहत्यांशी चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करत असतात. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा ही लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरे नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर आपल्या प्रीवेडिंगचे फोटो शेअर करून त्याने Just Married असे कॅप्शन लिहिले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दत्तू मोरे याने आज 23 मे, मंगळवारी लग्नाची गाठ बांधली. दत्तूने स्वाती घुनागेशी लग्न केले असून, ती स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि प्रीवेड्डिंग चे फोटो खुप सुंदर आहेत. या सुंदर जोडप्याला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छा देऊन खुप साऱ्या छान कमेन्ट केल्या आहेत. इन्स्टाग्राम पेजवर फ्रेम फायर स्टुडिओ या wedding फोटोग्राफरने दत्तू आणि स्वातीचे फोटो शेअर केले आहेत.

प्रीवेडिंगच्या फोटोमध्ये दत्तू आणि स्वाती खूपच सुंदर दिसत आहेत. दत्तूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘नवा सोबती, नवी सुरुवात’ आशिर्वाद असुद्या.. असे कॅप्शन लिहीत आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही लग्नाच्या जोड्यामध्ये खुप सुंदर दिसत होते. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने याने दत्तू आणि स्वातीच्या लग्नाला हजेरी लावली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील बऱ्याच कलाकारांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दत्तू आणि स्वातीची जोडी तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment