Maharashtra weather update: काळजी घ्या? महाराष्ट्रात या जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा!

Maharashtra weather update: राज्यात पुन्हा एकदा अवकळी पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. येत्या २-३ दिवसांत विदर्भ म्हणजेच (नागपुर, अमरावती, चंद्रपुर, अकोला, वर्धा, बुलढाना, यवतमाल, भंडारा, गोंदिया, वाशिम, गढ़चिरौली) या जिल्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवल जात आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गेल्या काही दिवसांपुर्वी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती . अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मार्च महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने आणि गारपीटीने झाली आहे. आणि यामुळेच रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला मोठा फटका बसला आहे.

राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव!

सध्या राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे, आणि त्यामुळेच उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

16 मार्चपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे जर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होऊ शकते अशी भीती आता व्यक्त होत आहे.

नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात 17 तारखेला गारपीट होईल असा देखील अंदाज समोर आला आहे. तसेच 18 मार्चला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Leave a Comment