Lagnanantar Hoilach Prem: सध्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांसाठी नवनवीन मालिका घेऊन येत आहे. या वाहिनीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, आता आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिली मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही आहे. या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय अंदाळकर मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.
याचबरोबर, काल १६ नोव्हेंबर रोजी आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेचं नाव ‘तू ही रे माझा मितवा’ असं आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून तो सध्या खूप चर्चेत आहे. या नव्या मालिकेत ‘कुन्या राजाची गं तू राणी’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जोग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता अभिजीत आमकरही झळकणार आहे. ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका २३ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Premachi Gosht : प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रमुख अभिनेत्याने सोडली, समोर आलं धक्कादायक कारण..
याशिवाय, या मालिकेत आणखी एका नावाजलेल्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ‘भाग्य दिले तू मला’ आणि ‘अबीर गुलाल’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री सुरभी भावेही या नव्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरभीने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.
Sapna Choudhary : बिग बॉस फेम ही अभिनेत्री झाली आई, बाळाचं नाव ठेवायला ३० हजार लोकांची गर्दी!
सुरभीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “कलाकार म्हणून नेहमीच छान भूमिका करण्याचं स्वप्न असतं. मात्र, प्रत्येक वेळी ते स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. एखादी भूमिका कितीही चांगली केली, तरी त्या भूमिकेला उत्तम चॅनेल, उत्कृष्ट टीम, आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आता हे सगळं गणित जुळून आलं आहे. माझ्या नवीन ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेमुळे मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेला प्रेक्षकांनी नेहमीच दिलं तसं किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम मिळेल.”
सुरभीने ही पोस्ट शेअर करत मालिका २३ डिसेंबरपासून ‘स्टार प्रवाह’वर रात्री १०.३० वाजता सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांच्यासोबत काम करण्याबद्दलही ती खूप उत्साहित आहे. तिच्या या पोस्टवर अनेक सहकलाकार आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरभीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘राणी मी होणार’ या मालिकेत झळकत आहे. त्याचबरोबर, तिने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातही काम केलं आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
‘स्टार प्रवाह’च्या या नव्या मालिकेसाठी शर्वरी, अभिजीत आणि सुरभी यांना प्रेक्षकांकडून खूप अपेक्षा आहेत. मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांमध्ये मालिकेबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता २३ डिसेंबरपासून या मालिकेचा प्रवास कसा होतो आणि प्रेक्षकांच्या मनात ही मालिका कितपत घर करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.