लागीर झाल जी या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला. या मालिकेतून जीजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कमल ठोके घराघरात पोहोचली. परंतु शनिवारी अभिनेत्री कमल ठोके यांच दुखद निधन झाल्याची बातमी समोर आली. कर्करोगामुळे अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. ही दुखद बातमी ऐकताच लागीर झाल जी मालिकेतील कलाकारांवर दुखाचा डोंगर कोसळला. या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जिजीना श्रद्धांजली वाहिली आहे.
शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकर म्हणते की “जिजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील गं.. भावपूर्ण श्रद्धांजली”

अजिंक्यची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण म्हणतो की “जीजे अजून खूप त्रास द्यायचा होता ग तुला. मला काय बोललेलीस प्रत्येक ठिकाणी मीच तुझी आज्जी असणारे आणि तूच माझा नातू, आपल्या दोघांना एकत्र खूप काम करायचं होतं ना मग का ग इतक्यात सोडून गेलीस”

भैय्या साहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड म्हणतो की “जिजे, छबुडे, कमळे का? खुप मोठी पोकळी केलीस RIP”

जयडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किरण ढाणे म्हणते की “जीजे, अजूनही मला पटत नाहीये गं.. आणि पटावं तरी का तू अजूनही आमच्या सोबतच आहेस.. फक्त वाईट याचं वाटतंय की आता मला प्रेमाने माझा जयडू, माझा बिरमुडा असं कोण बोलणार.. म्हातारे, मी तुला कधीच विसरू शकत नाही.. खूप खूप लव यू गं…”

पुष्पा मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या सावळे म्हणते की “जीजी! प्रेमाचा निखळ धबधबा ज्याच्यात प्रत्येकाने न्हाऊन निघावे, शब्दात व्यक्त न होणारं व्यक्तिमत्त्व जे आम्हाला आज कायमचं सोडून गेलं…. अश्या माझ्या लाडक्या जीजीला अखेरचा प्रणाम”
