झी मराठी वरील ‘देवमाणूस’ या मालिकेने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षकांनी या मालिकेवर तसेच या मालिकेतील प्रत्तेक पात्रावर भरभरून प्रेम केलं. यातील डॉक्टर म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड याची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडत होती. मालिकेचा शेवट ज्याप्रकारे झाला त्यानुसार ‘देवमाणूस’ या मालिकेचा दुसरा भाग येणार असं वाटत आहे.
मालिका संपल्यानंतर अभिनेता किरण गायकवाड याने मालिकेच्या सेटवरील काही फोटो पोस्ट करून कॅप्शन देत तो व्यक्त झाला आहे. हा संपूर्ण प्रवास त्याच्यासाठी कसा होता हे त्याने थोडक्यात सांगितले आहे . तसेच त्याने या पोस्ट द्वारे संपूर्ण ‘देवमाणूस’ टीमचे आभार मानले आहेत. आणि लवकरच काहीतरी भन्नाट घेऊन येईलच असही त्याने म्हंटल आहे.
तर तुम्ही ‘देवमाणूस’ ही मालिका मिस करताय का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.