कस्तुरी ही नवीन मालिका लवकरच कलर्स मराठीवर, ही मालिका होणार बंद?

कलर्स मराठी ही प्रेक्षकांची लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच काव्यांजली सखी सावली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका 29 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर कस्तुरी ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका २६ जूनपासून, रात्री 10:30 वा.प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कस्तुरी या मालिकेचा Promo नुकताच भेटीला आला आहे. Promo पाहता या मालिकेत बहीण भावाची कथा दाखवण्यात आली आहे. बहीण आपल्या मानलेल्या भावांना राखी बांधते, परंतु सख्खा भाऊ अजून राखी बांधण्यासाठी आलेला नसतो. नंतर सख्खा भाऊ येताच तो स्वतः आपल्या बहिणीला राखी बांधतो. बहीण आणि भावाच्या नात्याची कथा कस्तुरी या मालिकेत दाखवण्यात आली आहे.

https://youtu.be/THg-rLX9tTI

कस्तुरी या मालिकेत अभिनेत्री एकता लुबडे हिने बहिणीची तर अभिनेता दुष्यंत वाघने भावाची भूमिका साकारली आहे. एकताला आपण पौराणिक मालिकांमध्ये काम करताना पहिले आहे. ती या मालिकेत एका नव्या कोऱ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. एकता ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने स्टार प्रवाहवरील विठुमाऊली या मालिकेत रुक्मिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती.

अभिनेता दुष्यंत वाघ हा हिंदी सिनेमांमध्ये देखील काम करतो. तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याने तेरा मेरा साथ रहे, 3 इडियट्स, पानिपत अशा हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. धर्मवीर, महाराष्ट्र शाहीर, डोंबिवली फास्ट, सुंबरान, मोर्चा या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ना बोले तुम ना मैने कुछ कहा, मेरे अंगने मे या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

कस्तुरी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला 26 जूनपासून येणार असून, कलर्स वरील कोणती मालिका बंद होईल? हे अद्याप कळले नाही. तेव्हा पाहायला विसरू नका, कस्तुरी ही नवी कोरी मालिका.

Leave a Comment