Kashmira Shah : कॉमेडियन कृष्णा च्या बायकोचा भीषण अपघात..संपूर्ण बॉलीवूड हादरलं..

Kashmira Shah : प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कश्मीरा एका अपघातातून थोडक्यात बचावली आहे, आणि यासंबंधीची माहिती तिने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. कश्मीरा सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून तिचा अपघात तिथेच झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Kashmira Shah
Kashmira Shah

तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत या घटनेचा खुलासा केला. या फोटोत एका कारच्या सीटचा भाग दिसतोय, जिथे कपडे आणि टिश्यू रक्ताने माखलेले आहेत. हा फोटो शेअर करत कश्मीराने तिच्या अपघाताविषयी लिहिलं, “देवा, मला वाचवल्याबद्दल खूप आभार. हा भयंकर अपघात होता. काहीतरी मोठं घडू शकलं असतं, पण थोडक्यात बचावले. मला आशा आहे की या जखमांच्या खुणा राहणार नाहीत.”

तिने पुढे लिहिलं की, “प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, रोजचा दिवस जगा. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.” कश्मीराच्या या पोस्टने तिच्या चाहत्यांसह जवळच्या मंडळींनाही धक्का दिला आहे. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये असून तिचे दोन्ही मुलं, क्रिशांग आणि रेयान, भारतात कृष्णा अभिषेकसोबत आहेत.

Lagnanantar Hoilach Prem : भाग्य दिले तू मला मालिकेतील अभिनेत्री झळकणार स्टार प्रवाह च्या या नव्या मालिकेत..म्हणाली

कश्मीराच्या या पोस्टवर तिच्या पती कृष्णानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं, “थँक गॉड, तू सुरक्षित आहेस.” त्याचसोबत तनाज इराणी, किश्वर मर्चंट, आणि राजेश खट्टर यांसारख्या तिच्या मित्रमंडळींनीही कश्मीराच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली आहे.

कश्मीराचा अपघात किती गंभीर होता हे तिने पोस्ट केलेल्या फोटोवरून लक्षात येतं. मात्र, सुदैवाने ती मोठ्या अपायातून वाचली आहे. कश्मीराने तिच्या चाहत्यांना आणि मित्रांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. चाहत्यांनीही तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत कमेंट्सद्वारे तिच्यावर प्रेम व्यक्त केलं आहे.

Ankita and Suraj Chavhan BBM : सूरजच्या घरी मिळालेल्या वागणुकीबद्दल अंकिता स्पष्ठच बोलली..अंकिताच्या भावनांचा बांध फुटला..म्हणाली आता मला यात फसायच नाही!

कश्मीराचा अपघात झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांची तिला खूप आठवण येत असल्याचं तिने म्हटलं. सुदैवाने ती सुरक्षित असल्याचं ऐकून कृष्णासह तिचे चाहते आणि मित्र परिवारही सुस्कारा सोडत आहेत.

Leave a Comment