कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा संपन्न! लवकरच विवाहबांधनात अडकणार

सारेगमप Little Champs स्पर्धेची विजेती कार्तिकी गायकवाड हिचा रविवारी दिनांक २६ जुलै २०२० रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. काही दिवसांपूर्वीच गेल्या महिन्यात तिच्या बघण्याचा कार्यक्रम झाला होता. कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव रोनीत पिसे असून तो मेकॅनिकल इंजीनियर आहे आणि त्याचा स्वतचा बिझनेस आहे. कार्तिकीने आपल्या साखरपुड्याचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर केले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कार्तिकी गायकवाड ही मुळची अळंदीची आहे आणि रोणीत देखील एक पुणेकर आहे. रोणीतला तासनतास व्यायाम करायला खुप आवडतो. रोणीत पिसे हा कार्तिकीच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. कार्तिकीला संगीताची खूपच आवड आहे. कोरोना मुळे आत्ता फक्त त्यांचा साखरपुडा पार पडला आहे परंतु लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही असे स्वतः कार्तिकी गायकवाड हिने सांगितले आहे.

सारेगमप लिटिल चॅंप्स मराठीच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. त्यामुळे कार्तिकीला खुप प्रसिद्धी मिळाली. कार्तिकीने गायलेले घागर घेऊन हे गाणे तर प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. लहानशी कार्तिकी आत्ता खूप मोठी झाली आहे. कार्तिकी गायकवाड ला पाहून लोकांचा देखील विश्वास बसणार नाही. कार्तिकी आत्ता लवकरच विवाहबांधनात अडकणार असून atozmarathi.com कडून कार्तिकी आणि रोणीत यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

Kartiki Gaikwad Engagement Photo

Tags: Kartiki Gaikwad Engagement, Kartiki Gaikwad Husband, Kartiki Gaikwad and Ronit Pise, Kartiki Gaikwad Sakharpuda, Kartiki Gaikwad marriage

Leave a Comment