कलर्स मराठीवर नविन सुरू झालेली ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय . रिक्षा चालवून स्वतःचं शिक्षण आणि घर सांभाळणाऱ्या अंतराने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. या मालिकेतील श्वेताचा बॉयफ्रेंड मेघ म्हणजेच अभिनेता रौनक शिंदेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
रौनकने त्याची मैत्रीण प्राची मोरे सोबत साखरपुडा केला आहे. ते गेले ७ वर्ष एकमेकांना ओळखत आहेत आणि आता लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. रौनक हा मराठी अभिनेता तसंच दिग्दर्शक आहे. तसेच त्याची होणारी पत्नी प्राची ही प्रोफेशनल फॉटोग्राफर आहे.
अभिनेता रौनक शिंदेने याआधी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत अली आदिलशहा ही भूमिका त्याने साकारली होती.
तर अभिनेता रौनक शिंदे आणि प्राची मोरेची जोडी तुम्हांला कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.