कलर्स मराठी वाहिनी वरील सुर नवा ध्यास नवा हा शो जुनच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे . आणि याजागी १४ जुनपासून ‘जीव माझा गुंतला’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण ही मुख्य भुमिकेत दिसत आहे. याआधी योगिताने सोनी मराठी वरील नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेत काम केले होते. या नविन येणाऱ्या मालिकेमुळे सुर नवा ध्यास नवा हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १४ जुन पासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर तुम्ही येणाऱ्या या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात का आणि सुर नवा ध्यास नवा या शोला मिस कराल का हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .