कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका ही एक पौराणिक मालिका आहे. पूर्ण महाराष्ट्रभर घराघरांमध्ये पोहोचलेली ही मालिका रसिक प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. प्रत्येक चॅनल वर एक तरी पौराणिक मालिका असतेच. सर्व पौराणिक मालिकांपैकी जय जय स्वामी समर्थ ही एक आवडती मालिका आहे. ह्या मालिकेची trp सुद्धा चांगली आहे. या मालिकेमधून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भक्तिपूर्ण कहाणी आपल्याला पाहायला मिळते. नुकतेच या मालिकेमधील कलाकारांनी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी भेट दिली आहे.
या मालिकेतील स्वामींची भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय मुडावदकर, चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर आणि मालिकेतील इतर कलाकार स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. सर्वांत आनंदाची गोष्ट म्हणजे स्वामींची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर स्वामींच्या दर्शनासाठी गेले. अक्षयचे चाहते अक्षयला पाहताच गर्दी करू लागले. अक्षय जेव्हा मंदिराच्या परिसरात होता तेव्हा त्यांच्या चाहत्यांची गर्दी पाहून ते भावुक झाले. आपल्याप्रति प्रेक्षकांचे प्रेम पाहून त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आपल्या fans सोबत हसत हसत सेल्फी सुद्धा काढला. अक्षयने स्वामींच्या भूमिकेत एवढे छान काम केले आहे की त्यांना मिळणाऱ्या सदिच्छा आणि प्रेम हे मोलाचे आणि अभूतपूर्व आहे.
जय जय स्वामी समर्थ या मालिकेला प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. सध्या ही मालिका चांगल्या वळणावर आहे. या मालिकेतून स्वामींची चरित्रगाथा दाखवण्यात आली आहे. ही मालिका चाहत्यांची आवडती मालिका बनली आहे.