बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे याच्या वडिलांचे या कारणामुळे झाले निधन!

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाने आणि त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता जय दुधानेला पितृशोक झाला आहे. त्याच्या वडिलांचे नाव अनिल दुधाने असून त्यांचे हृदय बंद पडल्यामुळे निधन झाले आहे. जय दुधाने याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. जयच्या वडिलांवर 26 जून 2024 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

जय दुधानेने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. 24 जून च्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपर हिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी महत्त्वाची व्यक्ती होते. ते नेहमी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्ती साठी ओळखले गेले. सामाजिक कार्य ही त्यांची आवड होती आणि त्यांनी कधीही पैशांचा मोह केला नाही. नेहमी एक चांगला माणूस बनण्याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केला असल्याचे जयने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

जयने ही पोस्ट शेअर करताच कला विश्वातील त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी जयच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केल आहे. विकास पाटील, सोहम बांदेकर, पूर्वा शिंदे, पलक यादव, शिवम शर्मा, आरोह वेलणकर, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, दिव्या अग्रवाल, सोनाली पाटील असे सगळेच कलाकार जयच्या पाठीशी या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहिले आहेत.

जय दुधाने हा सध्या स्टार प्रवाह वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करत आहे. त्याची नकारात्मक भूमिका असून प्रेक्षकांना त्याची भूमिका खूपच आवडत आहे. बिग बॉस मराठी मध्ये जय दुधाने याने आपल्या परफॉर्मन्सने चांगलीच छाप सोडली होती. त्याशिवाय जयने ‘splitvilla’ या रियालिटी शो मध्ये देखील भाग घेतला होता.

अभिनेता जय दुधाने यांच्या वडिलांना AtoZ मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Leave a Comment