Janhvi Killedar : या मराठी अभिनेत्रीच्या घरी झाली चोरी , आणि आईला आला अर्धांगवायु चा झटका!

Janhvi Killedar : या मराठी अभिनेत्रीच्या घरी झाली चोरी , आणि आईला आला अर्धांगवायु चा झटका!2022 मधे कलर्स मराठी वाहिनीवर भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती . या मालिकेमधे जान्हवी किल्लेकर ने सानीया हे नकारात्मक खलनायिकेच पात्र साकारल होत . तरी देखील भाग्य दिले तू मला मधील जान्हवीचा अभिनय प्रेक्षकाना खूप आवडला होता .

Janhvi Killedar News
Janhvi Killedar News

काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. जान्हवी सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. सध्या तिने शेयर केलेला असाच एक विडियो चर्चेत आला आहे . अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या घरी चोरी झाली आहे. अचानक घरी चोरी झाल्यामुळे घरच्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तिची आई सुद्धा या धक्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे अस तिने सांगितल आहे.

जान्हवी ने सोशल मिडियाच्या माध्यमातून वीडियो पोस्ट करत आपल्या घरी चोरी झाल्याच सांगितल आहे . ती म्हणाली की, सगळ्यांनाच माहीत आहे की माझ पेन मध्ये घर आहे. आम्ही weekend ला तिथे जातो त्यामुळे ते आमच weekend होम बनल आहे . आमच्या या घरात नुकतीच चोरी झाली आहे.

आमच्या या घरातून चोराने बऱ्याच मौल्यवान वस्तु चोरी केल्या आहेत . स्पीकर , माझ्या भावाची गिटार ,महागडी घडयाळ ,माझ्या आईच्या साड्या या वस्तु चोरी झाल्या आहेत. चोराणी ac काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता . पण त्यांना ते जमल नसाव . तुमच ही अस कुठे घर असेल जे बंद आहे तर please काळजी घ्या. सगळीकडे चोराचा सुळसुळाट सुटला आहे.

पेन चे पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत पण चोर सापडतील की नाही याबद्दल काही खात्री नाही . कारण आम्ही फक्त weekend ला तिथे जातो त्यामुळे नेमकी चोरी कोणत्या दिवशी झाली याची आम्हाला कल्पना नाही. माझ्या आईने या सगळ्याच खूप टेंशन घेतल त्यामुळे तिला अर्धांगवायु चा अटॅक आला आहे.

आपण सर्वानी सतर्क रहा आणि काळजी घ्या हा विडियो नक्की बघा आणि सर्वांसोबत शेयर करा . जान्हवी च्या या पोस्ट वर असंख्य नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत जान्हवी बद्दल सहानभूती आणि आपुलकी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :

Tharal Tar Mag New Twist : ठरलं तर मग मालिकेत नवीन ट्विस्ट, प्रिया सगळ्यांना सांगणार महिपत आणि नागराज सत्य!

आई कुठे काय करते मधील संजनाने घेतलं हक्काचं घर! – एकेकाळी राहत होती पत्र्याच्या घरात

Leave a Comment