India vs England 5th Test Match : धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने मालिका 4-1 ने जिंकली.
धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. धरमशाला येथे खेळली गेलेली शेवटची कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 218 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने 477 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 259 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 195 धावांत ऑल आउट झाला. अशा प्रकारे भारताने ही कसोटी एक डाव आणि 64 धावांनी जिंकली.
धर्मशाला कसोटीतील विजयासह भारताने 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. 100 वी कसोटी खेळत असलेल्या आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 4 बळी घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आश्विनने 36 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रम केला. या कसोटीत अश्विन शिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही चमकले. या दोघांनी पहिल्या डावात शतके झळकावली होती.पहिल्या कसोटीत टीम इंडिया पराभूत झाली होती, पण त्यानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करत विझाग, राजकोट, रांची आणि आता धर्मशाला येथे सलग चार कसोटी जिंकल्या, आणि मालिका 4-1 ने जिंकली.
अश्विनने भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक म्हणजेच ५ बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडकडून जो रूटने दुसऱ्या डावात सर्वाधिक 84 धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने 39 धावांची खेळी खेळली. अश्विनने जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांना बाद केले. त्याने पहिल्या डावात 4 विकेट्सही घेतल्या होत्या.
रोहित शर्मा चा हा मोठा विक्रम !
भारताच्या ही मालिका जिंकण्यामुळे रोहित शर्मा असा एकमेव भारतीय कर्णधार बनला ज्याने ५ कसोटी मालिकेच्या शृंखलमध्ये पहिली मॅच हारुन सुद्धा ४-१ ने विजय मिळवला .