“स्नेहाचा मला खूप राग आला”- मीरा  

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक दिवशी नाती बदलतात. कधी मैत्री होते तर कधी त्याच व्यक्तीशी भांडण देखील होतं. कधी वैर तर कधी त्याच व्यक्तीशी जुळवून घ्यावे लागते. जोड्या दर आठवड्यात बदलताना देखील दिसतात. पहिल्या आठवड्यात अशीच जोडी दिसून आली ती म्हणजे मीरा आणि गायत्री. यामुळे गायत्रीला महेश मांजरेकर यांनी सुनावले देखील. मीराच्या मागे मागे करण्यात गायत्रीचा वैयक्तिक खेळ कुठेतरी मागे पडतो आहे. मीरा आणि गायत्री आज स्नेहा विषयी बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये मीरा गायत्रीला म्हणाली, “स्नेहा आणि माझा वाद झाला. कारण ती माझ्याशी उद्धटपणे बोलली. ती गुपचुपमध्ये कीडे करते आणि मग शांत बसते, क्युट बबली दिसते. आणि म्हणूनच मी तिथे बोलले की मी इथे काही क्युट बबली बनायला आले नाहीये. गायत्री म्हणाली, “स्नेहा मानत नाही तिने असं काही केले. मी स्नेहाशी बोलायला गेले. ती म्हणाली, म्हणजे मी काय करू ? मी तिला म्हणाले माझं तुला सांगण आहे की, मला तू आवडतेस, तू गोड आहेस. आपलं रिलेशन जर चांगलं रहायला हवं असेल तर माझ्या तोंडावर येऊन बोल. सुरेखा ताईंना देखील तसंच वाटलं होतं, आम्ही सगळे बसलो होतो त्यांनी मला सांगितले आम्ही सगळ्यांनी ते क्लिअर केलं. स्नेहा माझ्याशी आधी बोली असतं असं काही आणि मी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली असती तर ठीक होतं मग तू मुद्दा काढलास सरांसमोर. मुळात स्नेहाने तो मुद्दा काढायलाच नको. तिच्या तोंडातुन दोन शब्द नाही निघत कधी, आज पहिल्यांदा मी तिचा आवाज इतका ऐकला इतका”.
 
आता हा मुद्दा अजून किती ताणला गेला ? पुढे अजून काय काय झालं ? बघा आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment