झी मराठी वाहिनीवरअभिनेत्री हृता दुर्गुळेची नविन मालिका

झी मराठी वाहिनीवर एकामागे एक नवनवीन मालिकेंचे आलेले प्रोमो आपण पहिलेच. झी मराठी वाहिनीवर चार नविन मालिका आपल्या भेटीला येणार आहे . आणि आता या वाहिनीवर अजुन एक नव्या मालिकेची भर पडणार आहे. झी मराठी वाहिनीने कालच या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. या नविन येणाऱ्या मालिकेच नाव आहे ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत सगळ्यांची आवडती अभिनेत्री हृता दुर्गुळेआणि अभिनेता अजिंक्य राऊत मुख्य भुमिकेत दिसणार आहे. हृताला आपण याआधी दुर्वा, फुलपाखरू या मालिकेंमध्ये पहिले होते. तसेच ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकामद्धे देखील हृता ने काम केले आहे. आणि ती आता आपल्याला येणाऱ्या मराठी चित्रपट टाइमपास ३ मध्ये देखील दिसणार आहे. तर अभिनेता अजिंक्य राऊत याला आपण स्टार प्रवाह वरील विठुमाऊली या मालिकेत विठ्ठालाच्या भुमिकेत पहिले आहे. एकूणच झी मराठी वाहिनीवर ५ नविन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . ‘मन उडु उडु झालं’ ही मालिका ३० ऑगस्ट पासुन रात्री 7.३० वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर तुम्ही ‘मन उडु उडु झालं’ ही हृताची नविन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment