फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे . ऋताचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. इतकंच नव्हे तर सर्वात जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारी मराठी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळेच तिला महाराष्ट्राची क्रश असं म्हटलं जातं. ही अभिनेत्री आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
त्यांनतर हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याशी 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. चाहते त्या दोघांच्या लग्नासाठी खुपच उत्सुक आहेत.आता ऋता आणि प्रतिक लवकरच म्हणजेच पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याची बातमी कळाली आहे.
तुम्ही ऋता आणि प्रतीकच्या लग्नासाठी उत्सुक आहात का? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.