How to get new Voter Id card : घरीबसल्या तुम्ही पण बनवू शकता मतदान कार्ड, आणि घरपोच भेटेल सुद्धा!

जर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या जन्म तारखेनुसार जानेवारी २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केली असेल, तर तुम्ही २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही भाग घेऊ शकता. तुम्ही देखील देशात एक चांगले सरकार बनवून देशाच्या विकासात तुमचा वाटा देऊ शकता , यासाठी तुमच्याकडे फक्त निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, आणि नंतर निवडणुक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक यादीत तुमचे नाव देखील असले पाहिजे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी निवडणूक आयोगाने नवीन मतदारांसाठी काही सोप्या पद्धतींचा वापर केला आहे, जेणेकरून नवीन मतदार घरी बसून Voter Card बनवू शकतात आणि त्यांना ते घरपोच सुद्धा मिळेल.

होय, आता नवीन मतदार त्यांचे Voter Card ऑनलाइन पद्धतीने घरी बसून मिळवू शकतात, त्यासाठी आयोगाने एक अर्ज तयार केला आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र ऑनलाइन बनवू शकता, आणि तुम्ही ई-व्होटर आयडी डाउनलोड करू शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देतो , फक्त आम्ही लिहिलेला हा लेख काळजीपूर्वक वाचा.

नवीन निवडणूक ओळखपत्र कसे बनवावे: How to apply for new voter card?

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Voter Helpline मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल . त्यानंतर तुम्ही त्यावर विचारलेली सर्व कागदपत्रे भरून प्रक्रिया पूर्ण करा . हा अर्ज निवडणूक आयोगानेच जारी केला आहे, त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार आहे.

ही कागदपत्रे लागतील.

१) अर्जदार हा मूळचा भारताचा रहिवासी असला पाहिजे, तरच तुम्ही नवीन मतदान कार्ड साठी अर्ज करू शकता.

२) अर्जदाराने 1 जानेवारी 2024 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत.

३)अर्जदाराकडे रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे, आणखी की ओळखपत्र(आधार कार्ड, पॅन कार्ड ), पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आयडी पुरावा, ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहेत, तरच तुम्ही नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता.

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला Voter Helpline हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, जे की गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
  • तुम्हाला या ॲपवर तुमचे account तयार करावे लागेल. त्यासाठी तुमच्याकडे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे, या account साठी तुम्हाला तुमचे नाव, पासवर्ड, मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकावा लागेल, या नंतर तुमचे account तयार होईल.
  • आता तुमच्या समोर एक पेज उघडेल जिथे तुम्हाला Voter Registration , डाउनलोड e -EPIC, उमेदवारांची माहिती, निवडणूक निकाल, ताज्या अपडेट्स असे मतदार ओळखपत्राशी संबंधित अनेक सुविधा पाहायला मिळतील.
  • तुम्ही मतदार नोंदणीचा (Voter Registration)​​पर्याय निवडून नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता, सुधारणा करू शकता आणि आधार क्रमांक अपडेट करू शकता.
  • नोंदणीनंतर काही दिवसातच तुमचा नवीन मतदार ओळखपत्र तयार होईल , आणि तुमच्या आधारमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पोहोचेल, यासोबतच तुम्ही या मतदार हेल्पलाइनच्या मदतीने तुमच्या मोबाईलमध्ये ई-व्होटर आयडी ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

Leave a Comment