हे मन बावरे फेम अभिनेत्री सायली परब विवाह बंधनात अडकली!

कलर्स मराठी वरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील नेहा म्हणजेच अभिनेत्री सायली परब इंद्रनील शेलार सोबत लग्न बंधनात अडकली आहे. सायलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करत बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्स चा वर्षाव सुरू केला आहे. सायलीने हे मन बावरे या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली. तिने साकारलेली अनुची खास मैत्रीण नेहा ही व्यक्तिरेखा विशेष लक्ष्यवेधी ठरली. या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे सायलीला एक वेगळी ओळख मिळाली. तसेच ‘चुकभूल द्यावी घ्यावी’, ‘तिन्ही सांज’ या नाटकांमध्ये तिने काम केले आहे.

अभिनेत्री सायली आणि इंद्रनील शेलार यांचा १२ डिसेंबर २०१९ रोजी साखरपुडा पार पडला होता. इंद्रनील शेलार हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. सायली आणि इंद्रनील हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. ते चांगले मित्र देखील आहेत. दोघांनी अनेक वर्षांच्या मैत्रीच्या नात्याला आता एक वेगळं रूप दिल आहे.

अभिनेत्री सायली परब नुकतीच इंद्रनील शेलार सोबत सोबत लग्न बंधनात अडकली. हा लग्न सोहळा मुंबईमध्ये मोठ्या थाटात पार पडला. मुंबईतील horizon banquet हॉलमध्ये यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यांचे हळदी आणि लग्न समारंभातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सायली आणि इंद्रनील या दोघांलाही या नव्या आयुष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छां!

Title: He Mann Baware fame actress Sayali Parab Wedding

Sayali Parab and Indraneel Shelar Wedding Photo

Tags: Sayali Parab Wedding, Sayali Parab Marriage, Sayali Parab Lagn, Sayali Parab Engagement, Sayali Parab And Indraneel Shelar, Sayali Parab Husband, He Mann Baware fame Actress Sayali Parab Wedding

Leave a Comment